Saturday, June 13, 2015

hi friends ही आहे आमच्या spm ची गोष्ट. spm म्हणजे सपट परिवार महाचर्चा. हे कुठल्याही कार्यक्रमाचं नाव नाहीये तर हे आहे आमच्या कट्ट्याच नाव. नावासारखाच आमचा कट्टाही different आहे.तो जमतो जिथे आम्ही भेटतो. त्यासाठी विशिष्ट जागेची किंवा वेळेची गरज नसते. तो जमतो आमच्या dance क्लास च्या पायऱ्यांवर ,क्लास च्या एखाद्या कोपऱ्यात किंवा क्लास च्या बाहेर झाडाच्या पारावर. आणि तिथे तासनतास आमच्या चर्चा रंगतात ती एखाद्या programme विषयी असेल,कोणाच्या बर्थडे celebration ची असेल किंवा कुठलेही random विषय.विषय नसला तरी आपोआप ते निघत जातात. dance क्लासमुळे बनलेली आमची सहाजणींची gang. कुठलीही गोष्ट एकीला कळली की सगळ्यांपर्यंत क्षणार्धात पोहोचेल इतकं जबरदस्त network. मग ते क्लास सुटल्यावर खायला कुठे जायचं इथपासून कोणती वस्तू कुठे चांगली मिळते इथपर्यंत कशावरही आमची चर्चा रंगू शकते.कोणाचा career problem असो,family matter असो किंवा कोणाला काही येत नसेल तरी आमची expert team लगेच solution शोधून काढते. बाहेरच्या कोणी पंगा घेतला तर तिथेही लढायला पुढे असतेच.
म्हणूनच आमचा कट्टा सिमेंट concreat ने नाही तर तो बांधला गेलाय आमच्यातल्या हक्काने.कुठलीही गोष्ट सांगायची असेल तर बिनधास्त सगळ्या group ला ती सांगायची हा इथला नियम.त्यामुळे इथे भांडणही तितक्याच हक्काने होतात जितक्या हक्काने एकमेकांचे रुसवे फुगवे काढले जातात.म्हणूनच spm च्या महाचर्चेची गरज नेहमीच सगळ्यांना भासत राहील आणि dance class शिवाय तो अधुरा राहील. कारण त्यानेच मिळवून दिलाय हा कट्टा जिथे बंधन आणि आपुलकीची बांधिलकी आहे. सो special thanks to नुपूर नृत्यालय आणि आमची कट्टा gang-अक्षता, जान्हवी,मानसी,सुरभी आणि यशश्री

Friday, June 12, 2015

               त्या दिवशीच एका serial  मध्ये एक heroin  hero  ला म्हणते 'मला आवडत निर्जीव वस्तूंवरही प्रेम करायला कारण त्या आपल्या असतात'. सजीवांबद्दल आपण नेहमी विचार करतो पण निर्जीवांबद्दल  कधी करतो का?नाही कारण त्यांना मन,भावना नसतात.पण आपलेच पैसे खर्च करून आपण त्या घेतलेल्या असतात आणि आपल्या प्रत्येक गरजेला त्यांनी आपली साथ दिलेली असते.आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे त्या वस्तूशी  निगडीत आपल्या आठवणी असतात. आपली लहानपणीची खेळणी ज्यांनी आपल बालपण share  केलेलं असतं,कोणी काही गिफ्ट दिलेलं असेल जे देणारी व्यक्ती आपल्यासाठी खूप special असेल तर ते या आणि अशा बऱ्याच.                                                                                                                           आपण रोज चालवत असलेली गाडी जी नेहमी पायपीट करत आपल्याबरोबर भटकत असते. आपला mobile आपला संवाद व्हावा म्हणून battery  संपेपर्यंत आपल्याला बोलत ठेवतो.पण या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग पेट्रोल संपल किंवा आयत्यावेळेस  mobile चा  काही problem  झाला तर त्यालाच शिव्या घालतो.वस्तविक या गोष्टी नसेल तर जेवढी चलबिचल होते तेवढी एखादा माणूस आपल्याबरोबर नसेल तेव्हाही होत नाही. मग या एवढ्या बिन महत्वाच्या आहेत का?एखाद्या पुस्तकावर आपण कानाकोपऱ्यात लिहितो.,काही खुणा करतो आणि सगळ ज्ञान मिळाल्यावर सहज रद्दीत देऊन टाकतो तरीही ते भेलवाल्या काकांच्याही उपयोगात येत.आपण रोज बसतो ती खुर्ची,जमीन आपला सगळा भर निमुटपणे सहन करते. शाळेतला/कॉलेज मधला बकाही रोज आपली आतुरतेने वाट पाहत असतो. भिंती आपलं रक्षण करतात,रस्ता आपल्याला सतत पुढची वाट दाखवतो मग या सगळ्या गोष्टींबद्दल आपण कृतकृत्य तरी राहू शकतो ना?         

Thursday, June 11, 2015

        काय लिहावं सुचत नव्हत  विषयही मिळत नव्हता मग विषय आठवताना अचानक खूप दिवस डोक्यात असलेल एक वाक्य सुचलं  आमच्या short film मधलं 'कि त्या क्षणी मी काय करू शकतो तर प्रेम करू शकतो' आणि वाटलं yes हाच या blog  चा विषय. अशा बऱ्याच  गोष्टी आपण  ऐकलेल्या असतात पण त्यावर एवढा seriously  विचार आपण कधी केलेला नसतो. हे वाक्य ऐकल आणि  त्या दिवशी सहजच गजनी बघत होते तेव्हा click झालं कि yes आपणही बरंच  काही करू शकतो पण आपण किती वेळा करणार किंवा आपण करून असा काय फरक पडणार हा विचार करूनच आपण काहीच करत नाही.                                                                  खरतरं  गोष्टी खूप साध्या  असतात मी कचरा रस्त्यावर टाकणार नाही किंवा काहीही खरेदी करायला जाताना माझी bag घेऊन जाईन  यानेही पर्यावरणाला खूप मदत होऊ शकते. एखाद्या अंध व्यक्तीला काहीतरी वाचून दाखवीन,आजी आजोबांना रस्ता क्रॉस करायला मदत करेन अशा रोजच्या जगण्यातल्या गोष्टी पण त्याने समोरच्याच्या आयुष्यात खूप फरक पडू शकतो आणि  आपल्याला समाधान मिळत  ते वेगळंच.याने कदाचित आपलं  career  घडणारं  नाही किंवा खूप पैसे, नावही मिळणार  नाही पण आत्मिक समाधान मिळेल हे नक्की. आणि प्रत्येकवेळी स्वतःची काम सोडून, खूप वेळ देऊन अशा गोष्टी करण्याची गरज नसते सहज जाता जाता हि त्या गोष्टी होऊ शकतात.                                                                                       सध्या चर्चेत असलेला नेत्रदान हा विषय. खरच काय हरकत आहे आपण गेल्यानंतर आपला देह डोळे तसेही मातीतच मिसळणार आहेत मग एखादया  माणसाला जर त्याचा उपयोग होत असेल तर आपण का नाही त्याला ते  द्यायचं. इतके वर्ष आपण छान  आयुष्य जगलो आता दुसरा माणूस जगेल. त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठ गिफ्ट असेल ते आणि  आपणही त्याच्या माध्यमातून  चिरंतनराहू.                               व्यवहारातच सांगायचं झाल तर यातून direct फायदा झाला नाही तरी आपल्या गुडविल मध्ये हि गोष्ट नक्की राहील.म्हणूनच ते वाक्य सारख घोळत राहत 'आपण काय करू शकतो तर त्या क्षणी आपल्याला जे काही शक्य आहे ते सगळ  करू शकतो.                                                                                                                  समाजसेवकच  होऊन आपण हे सगळ करायला हवं  असं  नाही या समाजाचे आपणही काहीतरी देण लागतो या भावनेने करायला हवं. आणि सगळ्यात शेवटी त्याला  thanks ज्याच्या ह्या वक्यामुळे आज माझा blog चा विषय मला मिळाला.                                                                                                                        thank you so much atharv chavan  
      ५ june  पर्यावरणदिन म्हणून सगळीकडे साजरा करण्यात आला. पेपरातही त्या संबंधित उपक्रमांबद्दल खूप वाचलं. whatsapp वरही अनेक messages फिरत होते. पण इतकं सगळ  होऊनही खरच त्याबद्दल जागृती झाली का असा प्रश्न पडावा असा प्रकार पहिला. विभागाप्रमाणे स्पर्धा हि घ्यायचं ठरलं पण जिथे माणसातच एकी नाही तिथे पर्यावरणाबद्दल ची आच कुठून असणार. एकमेकांच्यातल्या हेव्यादाव्यांसाठी पर्यावरणालाही वेठीला धरायला ह्यांनी कमी केलं नाही. तेव्हा  वाटलं  माणूस किती स्वार्थी बनतोय मी माझं  मला यापलीकडेही जग असत याचा विसर पाडूनच  घेतलाय आपण. त्यादिवशीच आमच्या इथे घडलेला किस्सा. झाड तोडण  हि fashion  झाल्यासारखं आमच्या इथल्या काकांनी पटापट २ झाड तोडून टाकली का तर म्हणे त्यांना त्रास होत होता.   झाड तोडण्यासाठी माणसांना द्यायला त्यांच्याकडे पैसे होते पण तेच एखाद झाडं  विकत आणून लावायला नव्हते  झाडं  तोडून त्यांना पुरस्कार  मिळणार होता जणू अशा थाटात ते इकडेतिकडे फिरत होते . बर ते तोडून वर ते दुसर्यांच्या अंगणात नेउन टाकल्याचा आनंद  तर निराळाच होता. तो मी नव्हेच म्हणत या झाल्या चोराच्या  उलट्या बोंबा. दुसरा घडलेला किस्सा. जी समस्त ज्येष्ठ मंडळी आजच्या पिढीला नाव ठेवतात अशाच वर्गातल्या दोघांनी वैयक्तिक कारणासाठी झाडं सरळ सरळ मोडून टाकली आणि  घरच्यांनीही त्यांना अतिउत्साहाने प्रोत्साहन दिलं. आता जे लोकं फुटकळ भांडणासाठी पर्यावरणाला वेठीस धरतात अशांना खरच बुजुर्ग म्हणायचं का आणि हे आपल्या  किंवा आपल्या पुढच्या पिढीसमोर काय आदर्श ठेवणार आहेत. शारीरिक क्षमता कमी झाली असली तरी दुसर्यांना बोल लावायची शाब्दिक   क्षमता मात्र ह्यांची वाढतच असतेआणि त्याचा पुरेपूर वापर ते करत असतातच. पण हीच पिढी असले काही उद्योग करण्याऐवजी दुसर्यांना आपल्या कामात सामावून घेऊन झाड न माणसांची संख्या वाढवतायत आणि  दोन्हीतला दुवाही साधतायात हे जरा ह्यांनी लक्षात घेतलं तर बर होईल नाही का? हे त्यांच्यापर्यंत पोहोचावं  एवढंच  कारण हा ब्लॉग  लिहिण्यामागच.  

Saturday, April 25, 2015

गोष्ट तशी नेहमीचीच पण दोन क्षण विचार करायला लावणारी. 
एक फुगेवाले काका मला नेहमी दिसायचे सायकलवर फुगे विकताना. पुढे एक छोटा मुलगा आणि मागे एक मुलगी बसलेलीअसायची. खूप प्रेमळ असे हे काका. जास्तीत जास्त फुगे विकले जावे हीच एक तळमळ आणि हेच एक स्वप्न. फुग्यासारख त्याचं आयुष्य म्हटलं तर खूप सुंदर पण क्षणभंगुर. स्वतःच्या पाच मुलांना चांगले संस्कार,चांगल शिक्षण देण्याची तळमळ कायम त्यांच्या डोळ्यात दिसायची. त्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या कष्टांची,येणाऱ्या अडथळ्यांची जाणीव क्षणात विरून जायची. 
दोन मुली ट्रेन मध्ये वस्तू विकायच्या,एक मुलगी घर सांभाळायची आणि बायको दुसऱ्यांच्या घरची काम करायची. प्रत्येकाच्या डोळ्यात स्वप्न एकाच आपलं घरं आणि आपलं नातं. जरी ते रक्ताच्या पलीकडचं होत. दोन मुल जरी त्यांची असली तरी तीन मुली मात्र फुटपाथ,कचरा कुन्दिजवळ अशा कठीण परिस्थितीत त्यांना मिललेल्य. 'मुली' असूनही इतक्या कठीण परीस्थितीत कसं सांभाळू हे दडपण त्या दोघांनाही कधीच आलं नाही. कारण नात्यासाठी भरपूर वेळेची,पैशाची,काहीतरी special करण्याची गरज नव्हती . गरज होती फक्त संवादाची आणि एकमेकांबद्दलच्या ओढीची.नातं ही एकच गोष्ट पुरेशी होती त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी. 
मला रोज त्या काकांकडे बघून काहीतरी वेगळं जाणवायचं. एकदा फुगे घ्यायच्या निमित्ताने मी त्यांना विचारलं न समोर आली इतकी सुरेखगोष्ट. त्या काकांनी एकाच वाक्यात मला आयुष्याच सार सांगितलं जे कदाचित अनेक पुस्तकं वाचूनही मला कधी कळलं नसतं ते म्हणाले, 'आयुष्यासाठी मी नाही तर आयुष्य माझ्यासाठी आहे.'

Monday, April 20, 2015

                                                           शाळा 
शाळा एक रोजचीच जागा पण म्हटलं तर एक जग. आणि याच शाळेत एकमेकांना भेटले ते दोघ 
शाळेच्या पहिल्या दिवशी ओळख झाली पण मैत्री आणि प्रेम मात्र  अधुर,अबोल राहिलं. तो करियर ला प्राधान्य देणारा तर ती नाती जपणारी.दोन्ही विरुद्ध टोक पण दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल काहीतरी वाटायचं जे कधीच सांगता आलं नाही. आपापल्या बाकावरून चोरून कटाक्ष टाकला जायचा आणि या निःशब्द भावनेतून खूप सुख मिळायचं.दोघांनाही आपापले,जवळचे खूपजण होते. पण तरीही हक्काचं कोणीतरी हवं होत. 
अनेक दिवस,महिने,वर्ष गेली आणि एक दिवस शाळेच्या निरोपाची वेळ आली.त्या निरोपाबरोबरच त्यांनी एकमेकांचाही निरोप घेतला फक्त नजरेतूनच. एकमेकांचा आनंद,खंत सगळ काही न बोलताच कळत होत.एकमेकांबद्दलच्या भावना उमटल्या खऱ्या पण फक्त कागदावरच.एकमेकांशी एकही शब्द न बोलणारे ते विचारातून, मनातून, कृतीतून कायमचं एकमेकांशी जोडलेले होते. 
शिक्षण संपल, करियर घडलं,लग्न झालं , दोघ आपापल्या मार्गाने गेले पण हे अस्फुट नात मनाच्या तळाशी कायम राहिलं. पण नशीब म्हणतात ते हेच असेल कदाचित. आयुष्याच्या अशा वळणावर दोघ एकमेकांना भेटले जिथे सगळ काही होत नव्हत फक्त आपलं माणूस.
आज कित्येक वर्षानंतरही ते नातं तसच आहे. तीच ओढ, मनाच्या कोपऱ्यात नाही तर स्वतःच्या सर्वस्वात जपून ठेवलेली . हीच मर्मबंधातली ठेव अनुभवण्यासाठी,जपण्यासाठी ते निघालेत एकमेकांच्या साथीने एका वेगळ्या प्रवासाला.

Tuesday, April 14, 2015

प्रारंभ

                                                                     

                      आजपासून माझ्या blog ला  सुरुवात करत्ये. आपल्या संस्कृतीत चांगली काम चांगला मुहूर्त बघून केली जातात. पण खरं तर आपण चांगल काम ज्या क्षणापासून सुरु करू तो चांगला मुहूर्त असतो. आज blog सुरु करण्याचा हा मुहूर्त आहे कारण आयुष्याबद्दलचे फारसे विचार नसलेल्या वयातही रंग-रेषांचा माध्यमातून, साध्या सोप्प्या प्रेमळ वागण्यातून, आणि आपल्या कलेइतक्याच  गोड असलेल्या आपल्या स्वभावातून ज्या सगळ्यांच्या  आपल्याशा झाल्या अशा आमच्या फडके बाईंचा वाढदिवस !

                      मला आठवतंय  लहानपणीच्या माझ्या एका वाढदिवसाला त्या स्वतः केक घेऊन माझ्या घरी आलेल्या तेव्हा त्या आपल्यासाठी काहीतरी करतायत हे कळण्याच वय नव्हत पण प्रेमाने केलेली गोष्ट इतके वर्षानंतर आजही लक्षात आहे. आज कागदावर चित्र म्हणून जे काही थोडं फार काढता येतं ते त्यांचामुळेच.  त्यांचाकडे क्लास ला जायच्या आधी चित्रकलेत २५ पैकी ११ मार्क्स मिळायचे. आपल्या मुलीला जर बर चित्र काढता यावं या एकाच हेतूने आईने मला त्यांचाकडे पाठवलं आणि चित्रकलेत तर मार्क्स मिळालेच पण आणखीही बरचं  काही त्यांनी शिकवलं जे त्यांचा आठवणीतून, विचारातून कायमचा लक्षात रहिल.

                     फक्त शाळा किंवा चित्रकलेचा क्लास इतकाच त्याचं विध्यार्थ्यांशी नातं नव्हतं तर विध्यार्थ्यांचा लहानपणापासूनच सर्वांगीण विकास व्हावा असा त्यांचा नेहमी उद्देश होता. प्रत्येकाची आवड, कल लक्षात घेऊन प्रत्येकाला काहीतरी नव्याने देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. लहान मुलांबरोबर तितकच लहान होऊन त्या वागायच्या, कधी आईच्या, कधी शिक्षिकेच्या तर कधी मैत्रिणीच्या नात्यातून त्या मुलांची connect व्हायच्या आणि म्हणूनच सरस्वतीच्या सगळ्याच विध्यार्थ्यांच्या फडके बाई आवडत्या होत्या आणि नेहमीच असतील.

                    जेव्हा शिक्षक व्हावसं वाटायला लागलं तेव्हा पहिला आदर्श डोळ्यासमोर आला तो बाईंचा. म्हणूनच आज व्यक्त केलेल्या या भावना.  मी चौथीत असताना त्या गेल्या, हे आम्हाला शाळेतच सांगितलं गेलं. आता पोकळी निर्माण झाली इतका उच्च विचार करण्याची क्षमता तेव्हा नसली तरी आपल्या बाईंना गमावल्याची आणि त्या परत कधीच न भेटण्याची खंत आजतागायत मनात कायम राहिली.

                    म्हणूनच आज जी काही छोटीशी सुरुवात करत्ये ती त्यांचा आशीर्वादाने !