५ june पर्यावरणदिन म्हणून सगळीकडे साजरा करण्यात आला. पेपरातही त्या संबंधित उपक्रमांबद्दल खूप वाचलं. whatsapp वरही अनेक messages फिरत होते. पण इतकं सगळ होऊनही खरच त्याबद्दल जागृती झाली का असा प्रश्न पडावा असा प्रकार पहिला. विभागाप्रमाणे स्पर्धा हि घ्यायचं ठरलं पण जिथे माणसातच एकी नाही तिथे पर्यावरणाबद्दल ची आच कुठून असणार. एकमेकांच्यातल्या हेव्यादाव्यांसाठी पर्यावरणालाही वेठीला धरायला ह्यांनी कमी केलं नाही. तेव्हा वाटलं माणूस किती स्वार्थी बनतोय मी माझं मला यापलीकडेही जग असत याचा विसर पाडूनच घेतलाय आपण. त्यादिवशीच आमच्या इथे घडलेला किस्सा. झाड तोडण हि fashion झाल्यासारखं आमच्या इथल्या काकांनी पटापट २ झाड तोडून टाकली का तर म्हणे त्यांना त्रास होत होता. झाड तोडण्यासाठी माणसांना द्यायला त्यांच्याकडे पैसे होते पण तेच एखाद झाडं विकत आणून लावायला नव्हते झाडं तोडून त्यांना पुरस्कार मिळणार होता जणू अशा थाटात ते इकडेतिकडे फिरत होते . बर ते तोडून वर ते दुसर्यांच्या अंगणात नेउन टाकल्याचा आनंद तर निराळाच होता. तो मी नव्हेच म्हणत या झाल्या चोराच्या उलट्या बोंबा. दुसरा घडलेला किस्सा. जी समस्त ज्येष्ठ मंडळी आजच्या पिढीला नाव ठेवतात अशाच वर्गातल्या दोघांनी वैयक्तिक कारणासाठी झाडं सरळ सरळ मोडून टाकली आणि घरच्यांनीही त्यांना अतिउत्साहाने प्रोत्साहन दिलं. आता जे लोकं फुटकळ भांडणासाठी पर्यावरणाला वेठीस धरतात अशांना खरच बुजुर्ग म्हणायचं का आणि हे आपल्या किंवा आपल्या पुढच्या पिढीसमोर काय आदर्श ठेवणार आहेत. शारीरिक क्षमता कमी झाली असली तरी दुसर्यांना बोल लावायची शाब्दिक क्षमता मात्र ह्यांची वाढतच असतेआणि त्याचा पुरेपूर वापर ते करत असतातच. पण हीच पिढी असले काही उद्योग करण्याऐवजी दुसर्यांना आपल्या कामात सामावून घेऊन झाड न माणसांची संख्या वाढवतायत आणि दोन्हीतला दुवाही साधतायात हे जरा ह्यांनी लक्षात घेतलं तर बर होईल नाही का? हे त्यांच्यापर्यंत पोहोचावं एवढंच कारण हा ब्लॉग लिहिण्यामागच.
No comments:
Post a Comment