Tuesday, April 14, 2015

प्रारंभ

                                                                     

                      आजपासून माझ्या blog ला  सुरुवात करत्ये. आपल्या संस्कृतीत चांगली काम चांगला मुहूर्त बघून केली जातात. पण खरं तर आपण चांगल काम ज्या क्षणापासून सुरु करू तो चांगला मुहूर्त असतो. आज blog सुरु करण्याचा हा मुहूर्त आहे कारण आयुष्याबद्दलचे फारसे विचार नसलेल्या वयातही रंग-रेषांचा माध्यमातून, साध्या सोप्प्या प्रेमळ वागण्यातून, आणि आपल्या कलेइतक्याच  गोड असलेल्या आपल्या स्वभावातून ज्या सगळ्यांच्या  आपल्याशा झाल्या अशा आमच्या फडके बाईंचा वाढदिवस !

                      मला आठवतंय  लहानपणीच्या माझ्या एका वाढदिवसाला त्या स्वतः केक घेऊन माझ्या घरी आलेल्या तेव्हा त्या आपल्यासाठी काहीतरी करतायत हे कळण्याच वय नव्हत पण प्रेमाने केलेली गोष्ट इतके वर्षानंतर आजही लक्षात आहे. आज कागदावर चित्र म्हणून जे काही थोडं फार काढता येतं ते त्यांचामुळेच.  त्यांचाकडे क्लास ला जायच्या आधी चित्रकलेत २५ पैकी ११ मार्क्स मिळायचे. आपल्या मुलीला जर बर चित्र काढता यावं या एकाच हेतूने आईने मला त्यांचाकडे पाठवलं आणि चित्रकलेत तर मार्क्स मिळालेच पण आणखीही बरचं  काही त्यांनी शिकवलं जे त्यांचा आठवणीतून, विचारातून कायमचा लक्षात रहिल.

                     फक्त शाळा किंवा चित्रकलेचा क्लास इतकाच त्याचं विध्यार्थ्यांशी नातं नव्हतं तर विध्यार्थ्यांचा लहानपणापासूनच सर्वांगीण विकास व्हावा असा त्यांचा नेहमी उद्देश होता. प्रत्येकाची आवड, कल लक्षात घेऊन प्रत्येकाला काहीतरी नव्याने देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. लहान मुलांबरोबर तितकच लहान होऊन त्या वागायच्या, कधी आईच्या, कधी शिक्षिकेच्या तर कधी मैत्रिणीच्या नात्यातून त्या मुलांची connect व्हायच्या आणि म्हणूनच सरस्वतीच्या सगळ्याच विध्यार्थ्यांच्या फडके बाई आवडत्या होत्या आणि नेहमीच असतील.

                    जेव्हा शिक्षक व्हावसं वाटायला लागलं तेव्हा पहिला आदर्श डोळ्यासमोर आला तो बाईंचा. म्हणूनच आज व्यक्त केलेल्या या भावना.  मी चौथीत असताना त्या गेल्या, हे आम्हाला शाळेतच सांगितलं गेलं. आता पोकळी निर्माण झाली इतका उच्च विचार करण्याची क्षमता तेव्हा नसली तरी आपल्या बाईंना गमावल्याची आणि त्या परत कधीच न भेटण्याची खंत आजतागायत मनात कायम राहिली.

                    म्हणूनच आज जी काही छोटीशी सुरुवात करत्ये ती त्यांचा आशीर्वादाने !


7 comments:

  1. Khup chan survat ahe..mala khatri ahe je karshil tyat tula nakki yash milel :)

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिल आहेस. फड्के बाई पण तूला शुभ आशिर्वाद देत असतील. Keep It Up👍👍👍

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिल आहेस. फड्के बाई पण तूला शुभ आशिर्वाद देत असतील. Keep It Up👍👍👍

    ReplyDelete
  4. Shikshak ani vidyarthi hyancha madhla naata khup sundar shabdat mandlays...asha koni tari phadke bai kityekancha ayushyat yet astat...tya saglyanchach bhaavna thodkyat pan samarpak pane mandlya ahes....sundar lekhan (y)

    ReplyDelete
  5. अप्रतिम .... पुढील ब्लॉगसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

    ReplyDelete
  6. अप्रतिम .... पुढील ब्लॉगसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

    ReplyDelete