hi friends ही आहे आमच्या spm ची गोष्ट. spm म्हणजे सपट परिवार महाचर्चा. हे कुठल्याही कार्यक्रमाचं नाव नाहीये तर हे आहे आमच्या कट्ट्याच नाव. नावासारखाच आमचा कट्टाही different आहे.तो जमतो जिथे आम्ही भेटतो. त्यासाठी विशिष्ट जागेची किंवा वेळेची गरज नसते. तो जमतो आमच्या dance क्लास च्या पायऱ्यांवर ,क्लास च्या एखाद्या कोपऱ्यात किंवा क्लास च्या बाहेर झाडाच्या पारावर. आणि तिथे तासनतास आमच्या चर्चा रंगतात ती एखाद्या programme विषयी असेल,कोणाच्या बर्थडे celebration ची असेल किंवा कुठलेही random विषय.विषय नसला तरी आपोआप ते निघत जातात. dance क्लासमुळे बनलेली आमची सहाजणींची gang. कुठलीही गोष्ट एकीला कळली की सगळ्यांपर्यंत क्षणार्धात पोहोचेल इतकं जबरदस्त network. मग ते क्लास सुटल्यावर खायला कुठे जायचं इथपासून कोणती वस्तू कुठे चांगली मिळते इथपर्यंत कशावरही आमची चर्चा रंगू शकते.कोणाचा career problem असो,family matter असो किंवा कोणाला काही येत नसेल तरी आमची expert team लगेच solution शोधून काढते. बाहेरच्या कोणी पंगा घेतला तर तिथेही लढायला पुढे असतेच.
म्हणूनच आमचा कट्टा सिमेंट concreat ने नाही तर तो बांधला गेलाय आमच्यातल्या हक्काने.कुठलीही गोष्ट सांगायची असेल तर बिनधास्त सगळ्या group ला ती सांगायची हा इथला नियम.त्यामुळे इथे भांडणही तितक्याच हक्काने होतात जितक्या हक्काने एकमेकांचे रुसवे फुगवे काढले जातात.म्हणूनच spm च्या महाचर्चेची गरज नेहमीच सगळ्यांना भासत राहील आणि dance class शिवाय तो अधुरा राहील. कारण त्यानेच मिळवून दिलाय हा कट्टा जिथे बंधन आणि आपुलकीची बांधिलकी आहे. सो special thanks to नुपूर नृत्यालय आणि आमची कट्टा gang-अक्षता, जान्हवी,मानसी,सुरभी आणि यशश्री