Thursday, June 11, 2015

        काय लिहावं सुचत नव्हत  विषयही मिळत नव्हता मग विषय आठवताना अचानक खूप दिवस डोक्यात असलेल एक वाक्य सुचलं  आमच्या short film मधलं 'कि त्या क्षणी मी काय करू शकतो तर प्रेम करू शकतो' आणि वाटलं yes हाच या blog  चा विषय. अशा बऱ्याच  गोष्टी आपण  ऐकलेल्या असतात पण त्यावर एवढा seriously  विचार आपण कधी केलेला नसतो. हे वाक्य ऐकल आणि  त्या दिवशी सहजच गजनी बघत होते तेव्हा click झालं कि yes आपणही बरंच  काही करू शकतो पण आपण किती वेळा करणार किंवा आपण करून असा काय फरक पडणार हा विचार करूनच आपण काहीच करत नाही.                                                                  खरतरं  गोष्टी खूप साध्या  असतात मी कचरा रस्त्यावर टाकणार नाही किंवा काहीही खरेदी करायला जाताना माझी bag घेऊन जाईन  यानेही पर्यावरणाला खूप मदत होऊ शकते. एखाद्या अंध व्यक्तीला काहीतरी वाचून दाखवीन,आजी आजोबांना रस्ता क्रॉस करायला मदत करेन अशा रोजच्या जगण्यातल्या गोष्टी पण त्याने समोरच्याच्या आयुष्यात खूप फरक पडू शकतो आणि  आपल्याला समाधान मिळत  ते वेगळंच.याने कदाचित आपलं  career  घडणारं  नाही किंवा खूप पैसे, नावही मिळणार  नाही पण आत्मिक समाधान मिळेल हे नक्की. आणि प्रत्येकवेळी स्वतःची काम सोडून, खूप वेळ देऊन अशा गोष्टी करण्याची गरज नसते सहज जाता जाता हि त्या गोष्टी होऊ शकतात.                                                                                       सध्या चर्चेत असलेला नेत्रदान हा विषय. खरच काय हरकत आहे आपण गेल्यानंतर आपला देह डोळे तसेही मातीतच मिसळणार आहेत मग एखादया  माणसाला जर त्याचा उपयोग होत असेल तर आपण का नाही त्याला ते  द्यायचं. इतके वर्ष आपण छान  आयुष्य जगलो आता दुसरा माणूस जगेल. त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठ गिफ्ट असेल ते आणि  आपणही त्याच्या माध्यमातून  चिरंतनराहू.                               व्यवहारातच सांगायचं झाल तर यातून direct फायदा झाला नाही तरी आपल्या गुडविल मध्ये हि गोष्ट नक्की राहील.म्हणूनच ते वाक्य सारख घोळत राहत 'आपण काय करू शकतो तर त्या क्षणी आपल्याला जे काही शक्य आहे ते सगळ  करू शकतो.                                                                                                                  समाजसेवकच  होऊन आपण हे सगळ करायला हवं  असं  नाही या समाजाचे आपणही काहीतरी देण लागतो या भावनेने करायला हवं. आणि सगळ्यात शेवटी त्याला  thanks ज्याच्या ह्या वक्यामुळे आज माझा blog चा विषय मला मिळाला.                                                                                                                        thank you so much atharv chavan  

No comments:

Post a Comment