शाळा
शाळा एक रोजचीच जागा पण म्हटलं तर एक जग. आणि याच शाळेत एकमेकांना भेटले ते दोघ
शाळेच्या पहिल्या दिवशी ओळख झाली पण मैत्री आणि प्रेम मात्र अधुर,अबोल राहिलं. तो करियर ला प्राधान्य देणारा तर ती नाती जपणारी.दोन्ही विरुद्ध टोक पण दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल काहीतरी वाटायचं जे कधीच सांगता आलं नाही. आपापल्या बाकावरून चोरून कटाक्ष टाकला जायचा आणि या निःशब्द भावनेतून खूप सुख मिळायचं.दोघांनाही आपापले,जवळचे खूपजण होते. पण तरीही हक्काचं कोणीतरी हवं होत.
अनेक दिवस,महिने,वर्ष गेली आणि एक दिवस शाळेच्या निरोपाची वेळ आली.त्या निरोपाबरोबरच त्यांनी एकमेकांचाही निरोप घेतला फक्त नजरेतूनच. एकमेकांचा आनंद,खंत सगळ काही न बोलताच कळत होत.एकमेकांबद्दलच्या भावना उमटल्या खऱ्या पण फक्त कागदावरच.एकमेकांशी एकही शब्द न बोलणारे ते विचारातून, मनातून, कृतीतून कायमचं एकमेकांशी जोडलेले होते.
शिक्षण संपल, करियर घडलं,लग्न झालं , दोघ आपापल्या मार्गाने गेले पण हे अस्फुट नात मनाच्या तळाशी कायम राहिलं. पण नशीब म्हणतात ते हेच असेल कदाचित. आयुष्याच्या अशा वळणावर दोघ एकमेकांना भेटले जिथे सगळ काही होत नव्हत फक्त आपलं माणूस.
आज कित्येक वर्षानंतरही ते नातं तसच आहे. तीच ओढ, मनाच्या कोपऱ्यात नाही तर स्वतःच्या सर्वस्वात जपून ठेवलेली . हीच मर्मबंधातली ठेव अनुभवण्यासाठी,जपण्यासाठी ते निघालेत एकमेकांच्या साथीने एका वेगळ्या प्रवासाला.

Superbbbbb ahe...best blog ever read till nw.. :) i hope to read more lyk dem..
ReplyDeleteSuperbbbbb ahe...best blog ever read till nw.. :) i hope to read more lyk dem..
ReplyDelete