त्या दिवशीच एका serial मध्ये एक heroin hero ला म्हणते 'मला आवडत निर्जीव वस्तूंवरही प्रेम करायला कारण त्या आपल्या असतात'. सजीवांबद्दल आपण नेहमी विचार करतो पण निर्जीवांबद्दल कधी करतो का?नाही कारण त्यांना मन,भावना नसतात.पण आपलेच पैसे खर्च करून आपण त्या घेतलेल्या असतात आणि आपल्या प्रत्येक गरजेला त्यांनी आपली साथ दिलेली असते.आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे त्या वस्तूशी निगडीत आपल्या आठवणी असतात. आपली लहानपणीची खेळणी ज्यांनी आपल बालपण share केलेलं असतं,कोणी काही गिफ्ट दिलेलं असेल जे देणारी व्यक्ती आपल्यासाठी खूप special असेल तर ते या आणि अशा बऱ्याच. आपण रोज चालवत असलेली गाडी जी नेहमी पायपीट करत आपल्याबरोबर भटकत असते. आपला mobile आपला संवाद व्हावा म्हणून battery संपेपर्यंत आपल्याला बोलत ठेवतो.पण या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग पेट्रोल संपल किंवा आयत्यावेळेस mobile चा काही problem झाला तर त्यालाच शिव्या घालतो.वस्तविक या गोष्टी नसेल तर जेवढी चलबिचल होते तेवढी एखादा माणूस आपल्याबरोबर नसेल तेव्हाही होत नाही. मग या एवढ्या बिन महत्वाच्या आहेत का?एखाद्या पुस्तकावर आपण कानाकोपऱ्यात लिहितो.,काही खुणा करतो आणि सगळ ज्ञान मिळाल्यावर सहज रद्दीत देऊन टाकतो तरीही ते भेलवाल्या काकांच्याही उपयोगात येत.आपण रोज बसतो ती खुर्ची,जमीन आपला सगळा भर निमुटपणे सहन करते. शाळेतला/कॉलेज मधला बकाही रोज आपली आतुरतेने वाट पाहत असतो. भिंती आपलं रक्षण करतात,रस्ता आपल्याला सतत पुढची वाट दाखवतो मग या सगळ्या गोष्टींबद्दल आपण कृतकृत्य तरी राहू शकतो ना?
No comments:
Post a Comment